Terms and Conditions:
  • तुम्ही जर www.instagramin.in ह्या वेबसाईट वरून काही ऑर्डर करत असाल तर तुम्हाला आमच्या टर्म्स आणि कंडिशन्स मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो.
  • वेबसाईट वर जे प्रोडक्ट उपलब्ध आहेत ते फक्त भारत देशामध्ये डिलिव्हर केले जातील, जर भारताबाहेर तुम्हाला हे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्हाला ऑर्डर करण्या अगोदर आम्हाला तसे सांगावे लागेल कारण त्यानुसार डिलीव्हरी चार्जेस बदलू शकतात.
  • वेबसाईट वर जे प्रोडक्ट उपलब्ध आहेत त्याचा कोणत्याही गैरप्रकारामध्ये वापर केल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.
  • कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे ग्राहकाची ऑर्डर कॅन्सल करण्याचे सर्व हक्क इंस्टाग्रामीण कडे राखीव असतील.

Privacy Policy:
  • वेबसाईट वरून ऑर्डर करण्यासाठी आम्ही मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी स्विकारतो आणि हि खाजगी माहिती आम्ही कोणत्याही थर्ड पार्टी ला शेअर करत नाही.
  • वेबसाईट वरून ऑर्डर करण्यासाठी तसेच डिलिव्हरी करण्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारच्या OTP ची मागणी करत नाही. जर कोणी OTP ची मागणी गेली तर कोणीही OTP सांगू नये. जर ओटीपी सांगून तुमची आर्थिक फसवणूक झाली तर सदर वेबसाइट कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.
  • वेबसाईट वरील साडी, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू आम्ही स्वतः बनवत नसून आम्ही फक्त ह्या वस्तू विकण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देत आहोत. वेबसाईटवर ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्या वस्तू बनवणे ह्यासाठी लागणारे सर्व लायसन्स हे त्या वस्तूंच्या निर्मात्यांकडे उपलब्ध आहेत.
  • खाद्यपदार्थांसाठी लागणारे fssai लायसन्स हे निर्मात्यांकडे उपलब्ध आहेत.

Payment and Return Policy:
  • वेबसाईट वरून ऑर्डर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट स्विकारले जाईल.
  • कोणत्याही अटीवर कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध होणार नाही. (No COD)
  • तुमची ऑर्डर एकदा आम्हाला मिळाली कि आम्ही तुम्हाला पेमेंट कशे करायचे संबंधीत माहिती देऊ.
  • ग्राहकाला ऑर्डर डेलिव्हर झाल्यानंतर, पॅकेट/ऑर्डर पॅक असतानाचा विडिओ घ्यायचा आहे, तो विडिओ अनपॅक करून प्रॉडक्ट चा विडिओ स्वतः जवळ ठेवावा लागेल. जर तुम्हाला डिलिव्हर झालेल्या प्रॉडक्ट मध्ये काही त्रुटी असेल किंवा चुकीची ऑर्डर डिलिव्हर झाली आहे असे जर असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ आम्हाला पाठवावा लागेल.
  • जर ऑर्डरचा पॅक आणि अनपॅक चा विडिओ नसेल तर कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही.
  • प्रॉडक्ट फक्त डिफेक्टिव्ह म्हणजे फाटलेले, तुटलेले आणि ते विडिओ मध्ये स्पष्ट दिसत असेल तर ऑर्डर मिळाल्यानंतर २४ तासाच्या आत तक्रार स्वीकारली जाईल.
  • मला कलर चांगला दिसत नाही किंवा ऑर्डर केलेली वस्तू आवडली नाही ह्या सबबीखाली ऑर्डर कॅन्सल किंवा रिटर्न होणार नाही
  • एकदा ऑर्डर आणि पेमेंट केले कि ऑर्डर कोणत्याही कारणास्तव कॅन्सल होणार नाही.
  • जर तुमच्याकडे आम्ही सांगितल्या प्रमाणे व्हिडिओ असेल तर तुमचे प्रॉडक्ट रिटर्न होऊ शकते त्यासंबंधी प्रोसेस आम्ही तुम्हाला त्या वेळेस कळवू.
  • जर तुम्ही रिफंड साठी पात्र असाल तर तुम्हाला ४ ते ७ दिवसात तुमचे पैसे मिळून जातील.

Delivery:
  • वेबसाईट वरून ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला तुमची ऑर्डर जर ऑर्डर महाराष्ट्र राज्यातील असेल तर ५ ते ७ वर्किंग डेज मध्ये मिळेल. जर ऑर्डर इतर राज्यांमधून असेल तर ऑर्डर मिळण्यास ५ ते १० वर्किंग डेज लागू शकतात.
  • काही नैसर्गिक आपत्तीमुळे जर ऑर्डर डिलिव्हरीला उशीर होत असेल तर तुम्हाला डिलिव्हरी करणारी कंपनी तसा मेसेज करेल किंवा तुम्ही तुमची ऑर्डर ट्रॅक करू शकाल.
  • आपण कोणतेही अकाउंट ओपन न करता ऑर्डर करण्याची सुविधा प्रदान करत आहोत त्यामुळे ऑर्डर दिल्यानंतर आम्ही तुम्हाला ऑर्डर ट्रॅकिंग संबंधित एक फोटो तुमच्या व्हाट्सअँप वर १ ते २ दिवसात शेअर करू ज्याचा वापर करून तुम्हाला तुमची ऑर्डर ट्रॅक करता येईल.
  • जर ऑर्डर परदेशातून (भारत देशाबाहेरील) असेल तर आम्ही तुम्हाला डिलिव्हरी चार्ज आमच्या डिलिव्हरी पार्टनर सोबत माहित करून सांगू.
  • भारत देशाबाहेरील ऑर्डरला फ्री (Free) डिलिव्हरी नाही राहणार.